Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

श्रीलंकेत सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट; १०० हुन अधिक मृत्युमुखी

Share

कोलंबो : श्रीलंकेतील कोलंबो येथे आज सकाळी साखळी बॉम्बस्फोटाने शहर हादरले असून यात १०० हुन अधिक जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. इस्टर संडेच्या दिवशी सेंट अंटोनी चर्च तसेच इतर भागात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान या स्फोटांत ४०० हून अधिक लोक जखमी झाले असून कोलंबोतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. जखमी आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोलंबोमधील कोचिकाई येथील सेंट अंटोनी चर्च, शांग्रिला हॉटेल, सिनॅमन ग्रँड हॉटेल, किंग्जबरी हॉटेल या चार ठिकाणी रविवारी सकाळी बॉम्बस्फोट झाले. कोलंबोच्या थोडसं बाहेरच्या बाजूला असलेल्या नेगोम्बो आणि मट्टाकलाप्पू इथल्या चर्चमध्येही स्फोट घडविण्यात आले.

पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सुरक्षेसंबंधीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावली आहे. तर राष्ट्राध्यक्ष मैथिरीपाल श्रीसेना यांनी अफावांवर विश्र्वास ठेऊ नका असं आवाहन नागरिकांना केलं आहे.

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेतील भारतीयांच्या सुरक्षेसाठी आपण सातत्यांनं कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात असल्याचं ट्वीट केलं आहे. भारतीयांच्या मदतीसाठी सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हेल्पलाईन नंबरही दिले आहेत.

Tags:

1 Comment

  1. Popat Pathare April 21, 2019 1:34 pm

    Deshdoot is working very nicely
    We proud of it
    🖒

    Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!