महाविद्यालयांमध्ये होणार नवमतदार नोंदणी

0

कक्षही स्थापन करण्यात येणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदार नोंदणी मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. नवमतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी शहराससह जिल्ह्यातील महाविद्यायात मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी कॉलेज प्रशासनावर टाकण्यात आली आहे. कॉलेज अ‍ॅडमीशन घेतेवेळी विद्यार्थ्यांना आता मतदार नोंदणीचे प्रमाणपत्र (पुरावा) जोडावा लागणार आहे.
जिल्हाधिकार्‍यांच्या निर्दशानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांच्यावर संबधित विद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार म्हणून यादीत नोंद करण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका निर्भय व मुक्त वातावरणात पार पडण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगांची आहे. त्यानुसार आयोगाने दिलेले आदेश सर्वांसाठी बंधनकारक राहणार आहेत.

भारताने लोकशाही पध्दत स्विकारली असल्यामुळे 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. मतदार म्हणून संबधित व्यक्तीची नावे मतदार यादीत असणे आवश्यक आहे. 1 जानेवारी रोजी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुणाची मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
युवक-युवतींचा मतदाना प्रक्रियेतील घटलेली टक्केवारी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून तरूणांचा सहभाग वाढविण्यासाठी कंबर कसली आहे.
सर्व विद्यापीठ महाविद्यालय,तंत्रशिक्षण संस्था आदींनी प्रथम वर्षात प्रवेश घेणार्‍या युवक युवतींकडून मतदार नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र प्रवेश अर्ज सोबत भरून घेतले जाणार आहे. त्यासाठी प्राचार्यांनी एका प्राध्यापकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावयाची आहे. संबधीत अर्ज जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा करावी.

युवक युवतींचा मतदार नोंदणीत सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर वकृत्व, निंबध स्पर्धाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय राष्ट्रीय मतदार दिना प्रमाणे जिल्हा मतदार दिन यापुढे साजरा करण्यात येणार आहे.
– अरूण आनंदकर
उपजिल्हाधिकारी निवडणूक शाखा.

LEAVE A REPLY

*