अनुदानासाठी महाविद्यालयीन शिक्षक 11 पासून संपावर

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय यांची अनुदान पात्र यादी घोषित करून शंभर टक्के अनुदानासाठी आर्थिक तरतूद करावी, ही मागणी मान्य न केल्यास 11 डिसेंबरपासून कनिष्ठ हाविद्यालय बेमूदत संपावर जाणार असून येणार्‍या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय कृती समितीने दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन पालवे, प्रा. संजय शेवाळे, एल. ए. बेळगे, प्रा. सुभाष चिंधे, ए. ए. इनादार, डी.व्ही. बोरूडे, वाय. एस. पाटोळे, अ. भा. गायकवाड, एस. एस. धाणे, एन. के. साळवे, एस. एस. बाबर, बाळासाहेब गुंजाळ, डी. ए. पठाण, प्रा. राहुल जाधव, प्रा. डी. बी. जरे, प्रा. उमादेवी शेळके, आदी उपस्थित होते.
विना अनुदानित कनिष्ठ हाविद्यालयाचा काय शब्द काढून 2014-15 साठी लागणार निधी स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात येईल. यासंबंधी फेबु्रवारी 2014 ला शासन निर्णय झाला. 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप पात्र यादी जाहीर करण्यात आली नाही. त्यासाठी एकाही रूपयाची तरतूद करण्यात आली नाही. कृती समितीने आजपर्यंत याबाबत 204 आंदोलने केली असून शिक्षकांची नोकरीची 18 वर्षे वाया गेली आहेत.
त्याकडे शासनाने जाणीवपूर्वक दुुर्लक्ष केल्याने शिक्षकांध्ये तीव्र नाराजी आहे. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे पुणे येथील सर्व प्रस्ताव मुंबईत शालेय शिक्षण विभागात दाखल करून घेवून पुढील कार्यवाही लवकरच करण्याचे आश्‍वासन मागील वर्षी दिले होते.
सरकार आपल्या बाजुने आहे. लवकरच प्रश्‍न टिवू, असे शिक्षणंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत घोषणा केली होती. परंतु आजपर्यंत शासनाने या विषयात कोणतीही कार्यवाही केली नाही.
यामुहे या शैक्षणिक वर्षातील बारावी परीक्षेच्या काकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल. तसेच बारावी परीक्षेची उत्तरपत्रिका तपासण्यात येणार नाही. परीक्षेचे सुपरव्हिजन करण्यात येणार नाही, असा इशारा निवेदनात दिला आहे.

LEAVE A REPLY

*