Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : जिल्हाधिकाऱ्यांनी केली नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याची पाहणी

Share

निफाड | प्रतिनिधी

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात भेट देऊन पाहणी केली. तर नदीकाठच्या गावांना सावधानता बाळगण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचे आगमन झाल्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरण ५५ टक्क्यांपेक्षा अधिक भरले होते.

या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याधिकारयांनी नांदूरमध्यमेश्वर धरणावर जाऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. या धरणातून विसर्ग करण्यात आल्यानंतर पुढे किती गावांना धोका निर्माण होऊ शकतो याबाबत त्यांनी माहिती जाऊन घेतली.

यावेळी मांढरे यांनी धरणाची पाणी साठवण क्षमता, कालवे वहन क्षमता, पूर परिस्थिती याबाबत पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

यावेळी नांदूरमध्यमेश्वर धरणावर निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांत अर्चना पठारे, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता एस आर शिंदे, उपअभियंता प्रशांत ढोकने, शाखा अभियंता व्ही एस नागपुरे, कोपरगाव अभियंता निकम आदींची उपस्थिती होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!