अवजड बंदी अवघी 24X9; बोल्हेगाव, नागापूरचे खड्डे बुजवा; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– नवरात्रौत्सव काळात शहरात होणारी गर्दी लक्षात घेता या काळात अजवड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी आज दिले. तसेच बंद पडलेले सिग्नल सुरू करून बाह्यवळण रस्ता, शहरातील, नागापूर-बोल्हेगावातील खड्डे पुर्णपणे भरुन काढावेत असे आदेश त्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात अजवड वाहतुकीसंदर्भात सोमवारी (दि.18) बैठक झाली. आमदार संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह बांधकाम विभाग व मनपाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होेते.
गुरुवारी (दि.21) नवरात्रौत्सव सुरू होत आहेत. मोहरम सण देखील तोंडावर आला आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधीकार्‍यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली होती. त्यात ऐरणीवर आलेल्या मुद्यांवर जिल्हाधिकार्‍यांनी तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शहरातून जाणारी अवजड वाहतूक नवरात्रीच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर सर्व सिग्नलांची तपासणी करुन बंद पडलेले सिग्नल चालु करण्यात यावेत, शहरातील खड्डे, बोल्हेगाव फाटा परिसरातील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत तसेच शहरात काही ठिकाणची वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

*