Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कलेक्टर ऑफिसच्या आवारात दारूसाठी ‘सरकार मान्य बैठक’

Share

विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या, नागरिकांसाठी मात्र सर्वत्र असुविधा

अहमदनगर (प्रतिनिधी) – कलेक्टर ऑफिसच्या आवारात असणार्‍या अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि करमणूक शाखेसमोर जप्त करून आणलेल्या वाळूच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत चक्क रिचवनू रिकम्या पडलेल्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी बंदोबस्त असतांना कलेक्टर ऑफिसच्या आवारात ही ‘सरकार मान्य बैठक’ कोणाच्या पाठिंब्यावर आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सुरक्षेच्या कारणामुळे याच परिसारात न्याय हक्कासाठी सर्वसामान्यांचे लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन करण्यास मज्जाव घातला आहे. मात्र, दुसरीकडे याच परिसारात असणार्‍या सरकारी कार्यालयाच्या आवारात रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्याने जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!