‘जेएनपीटी’तर्फे नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्षांसाठी शीतगृहे उभारणार – नितीन गडकरी

0
नाशिक ।  नाशिकला जेएनपीटीतर्फे कांदा आणि द्राक्षांसाठी शीतगृहे बनवणार आणि निर्यातीला चालना देणार असल्याची घोषणा आज रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रलंबित प्रकल्पांना त्यांनी हिरवा कंदील दाखवून लवकरच काम सुरु करण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

मुंबई, पुणे आणि नाशिक हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा सुवर्ण त्रिकोण असून शेती उत्पादने, उद्योग व्यापाराच्या विकास दारात मोठी वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये कोल्ड स्टोरेज उभारले जावे अशी मागणी होत होती.

अखेर आज यासंदर्भात गडकरी यांनी घोषणा केल्यामुळे नाशिकचा उद्योगवाढीस लागणार असून रोजगार उपलब्धी होणार आहे. याठिकाणी कोल्ड स्टोरेज नसल्याने अनेकदा निर्यातक्षम उत्पन्न घेऊन देखील उत्पादन निर्यातीला अडचणी येत होत्या.

प्रामुख्याने मुंबई, पुण्यानंतर उद्योग, व्यापार, कृषी आदींसह अर्थ, फलोत्पादन आणि अन्य क्षेत्रात नाशिकचे महत्त्व लक्षात घेता नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला सोयीचे होईल या दृष्टिकोनातून ड्रायपोर्ट प्रकल्प उभारणे काळाची गरज असल्याचे सांगितले होते.

हा प्रकल्प उभा राहिल्यास विकासाला मोठी चालना मिळणार असून त्यातून विकासदरात मोठी वाढ होणार आहे. यामुळे राज्याच्या विकासाचा दर अन्य राज्यांपेक्षा अनेक पटीने वाढणार आहे. नाशिक येथून मुंबईला जलद मालवाहतूक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे नाशिक येथून कृषी उत्पादने व औद्योगिक मालाची जलद ने-आण विकासवृद्धीसाठी प्रेरक ठरणार असल्याचेही गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच ड्रायपोर्टमुळे नाशिकच्या विकासालाही चालना मिळणार असल्याची भूमिका आ. अपूर्व हिरे यांनी मांडल्यानंतर या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी देऊन प्रकल्प उभारण्यास गती देण्याचे ठोस आश्वासन गडकरी यांनी दिल्याचेही हिरे यांनी सांगितले होते. अखेर आज पत्रकार परिषदेत घोषणा याबाबत गडकरी यांनी घोषणा केल्यामुळे लवकरच नाशकात पोर्ट उभारणीच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कालच नागपूर येथे माझी नाशिक ला ड्रायपोर्ट उभारणीच्या संदर्भात केंद्रीय दळणवळणमंत्री ना .नितिनजी गडकरी साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली होती रेल्वे व महामार्ग च्या सोयीनूसार नाशिक ला ड्रायपोर्ट साठी शासनाने आज मंजूरी दिल्या बदल मंत्रीमहोदयांचे मनापासून आभार .जिल्यातील कृषीपूरक उदयोगांना निश्चितपणे यामूळे संजिवनी मिळणार आहे.

  • आ. डाॅ.अपूर्व हिरे

LEAVE A REPLY

*