Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: आचारसंहितेमुळे मनपाकडून कारवाई

Share

शहरातून जाणार्‍या राज्यमार्गावरील फलक, झेंडे काढले

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महापालिकेने शहरातील फलक व झेंडे काढण्याची कारवाई हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा काल झाली. ही घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने लगेच कारवाईस वेग दिला. या पथकाने आयुर्वेद महाविद्यालय, टिळक रस्ता, स्वस्तिक चौक, केडगाव, पुणे बायपास अशी पहिल्या टप्प्यात कारवाई केली. तसेच जुने बसस्थानक, मार्केटयार्ड चौक, चांदणीचौक, कोठला स्टँड, पोलीस अधीक्षक चौक, पत्रकार चौक, मनमाड रस्ता ते थेट नागापूर परिसर अशी दुसर्‍या टप्प्यात कारवाई केली.

या कारवाईत ठिकठिकाणी लावलेले फलक, विविध पक्षांचे झेंडे काढण्यात आले. तसेच मतदारांवर प्रभाव पडेल, असा मजकूर असलेले भित्तीपत्रकेही काढण्यात आली. आज ही कारवाई शहर व उपनगरात होणार आहे. कालची कारवाई शहरातून जाणार्‍या महामार्गावर करण्यात आली. दोन दिवसांत हा सर्व परिसर फलकमुक्त करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.

तसेच महापालिकेत निविदास्तरावर असलेली कामे, ठिकठिकाणी सुरू न झालेली विकास कामे थांबविण्याचे आदेश आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले. महापालिकेने आचारसंहिता लक्षात घेऊन विविध निविदांना मंजुरी मिळविली आहे. मात्र ही कामे सुरू झालेली नाहीत. तसेच बुरूडगाव कचरा डेपो येथे खत प्रकल्प करण्यासाठीची निविदाही मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र निविदा मंजूर असून, चालत नाही तर प्रत्यक्षात काम सुरू झाले तर ते आचारसंहितेत केले तरी चालते. अद्याप ते काम सुरू झालेले नाही. अत्यावश्यक बाब म्हणून या कामासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी आणणे आवश्यक झाले आहे. कचरा डेपो बंद असल्याने तो तातडीने सुरू करण्यासाठी या बाबी आवश्यक असल्याने असे प्रयत्न होणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!