Friday, April 26, 2024
Homeनाशिकलासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….

लासलगावच्या रस्त्यावर जेव्हा सहा फुटांचा कोब्रा अवतरतो….

लासलगांव | वार्ताहर 

येथे  ‘कोरोना’” या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे सर्व रस्त्यावर शांतता असताना येथील कान्हा डेअरी समोरील असलेल्या दुभाजकाला वरील विद्युत पोलवर सहा फुटी  विषारी इंडियन कोब्रा जातीचा नाग आढळून आल्याने एकच धांदल उडाली होती.

- Advertisement -

शहरातील वर्दळीच्या असलेल्या कान्हा डेअरी परिसरातील दुभाजकाजवळ असलेल्या विद्युत पोलवर जमिनीपासून पाच फुटावर  हा कोब्रा जातीचा नाग आढळून आला.

एवढा मोठा नाग आढळून आल्याचे समजताच बघ्यांनी मोठी गर्दी परिसरात केलेली दिसून आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील ओट्याजवळ हा कोब्रा आल्यानंतर असिफ नामक सर्पमित्राने नागाला एका बाटलीत पकडले.

यानंतर विंचुर येथील म्हसोबा माथ्यावर सोडून देण्यात आले. पहिल्यांदाच लासलगावकरांनी पाहिलेल्या एवढ्या मोठ्या कोब्रा जातीच्या नागाची चर्चा रात्री उशिरा शहरात सुरु होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या