Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करा – सुभाष देशमुख

Share

नाशिक | प्रतिनिधी

सभासदांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या वैभवासाठी सहकार क्षेत्र समृद्ध होणे आवश्यक असून या क्षेत्राच्या प्रगतीसाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी सहकारी संस्थेचे विश्वस्त म्हणून काम करावे, असे आवाहन सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी  केले.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे आयोजित सहकार पुरस्कार 2017-18 वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे,  सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय समितीचे सदस्य अविनाश महागावकर, विभागीय सहनिबंधक (लेखा परीक्षण) आर.सी.शाह आणि जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे  आदी उपस्थित होते.

याप्रसंगी देशमुख म्हणाले, सहकार समृद्ध झाल्याशिवाय राज्य समृद्ध होणार नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना राजकीय विचार बाजूला सारून संस्था मोठी करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. राज्यातील 50 टक्के लोकसंख्या सहकार क्षेत्राशी जोडली गेली असली तरी सामान्य शेतकरी आणि समाजातील प्रत्येक घटक सहकाराशी जोडला जायला हवा. त्यासाठी इतर संस्थांनी चांगल्या संस्थांचा आदर्श घ्यावा. शेतकरी सभासदांना संस्थेच्या माध्यमातून  कसे सहकार्य करता येईल याचा विचार करावा. संस्थास्तरावर चर्चा करून आपले प्रश्न सोडवावेत. पारदर्शक कारभार केला तर तक्रारी कमी होऊन ग्राहकांचे हित साधता येईल.

सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करताना अडचणीतील संस्थांना मदत करण्यात येत आहे. ई-नामाच्या माध्यमातून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न होत आहे. 3500 विविध कार्यकारी संस्थांनी शासनाची मदत न घेता स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. अशा संस्थांनी तयार केलेला माल मॉल मधून विकण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. सहकाराच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि बचत गटांनादेखील उन्नतीसाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गावातला तरुण आणि पैसा गावातच राहण्यासाठी विविध कार्यकारी संस्था मजबूत करणे व त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे आवश्यक आहे. पुरस्कारप्राप्त संस्थांनी एकेक संस्था दत्तक घेऊन त्या संस्थेच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील श्री.देशमुख यांनी केले. राज्याच्या अनेक भागात पुरामुळे नुकसान झाले असून या भागातील जनतेचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सहकारी संस्थांनी पुढे यावे व मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावे, असेदेखील त्यांनी सांगितले.

सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि कामकाज कार्यक्षमपणे करण्यासाठी डिजिटलायझेशनवर भर देण्याची  गरज असल्याचे महागावकर यांनी सांगितले. सहकारात युवकांचा सहभाग वाढण्यासाठी विविध संस्थांना मिळालेले पुरस्कार प्रेरणादायी ठरतील़, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात सोहनी म्हणाले, राज्यातील 2 लाख सहकारी संस्थांच्या कामकाजात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कामकाजात आधुनिक व्यवस्थापन आणण्यासाठी 10 संस्थांची प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा 50 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी देशमुख यांच्या हस्ते ‘सहकार गौरव’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या हस्ते सहकार महर्षि, सहकार भुषण आणि सहकार निष्ठ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्ञानदिप को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विक्रोळी (पु.) मुंबई या संस्थेला एक लाखचा सहकार महर्षि पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेने सांगली आणि कोल्हापूर येथील महापूरात क्षतीग्रस्त झालेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली.

बॅसिन कॅथॉलिक सहकारी बँक पालघरतर्फे 30 लाख, माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती 31 लाख 51 हजार, साई सेवा ग्रामीण बिगरशेती शेतकरी सहकारी पतसंस्था श्रीगोंदा 5 लाख 55 हजार बँक, अभिनंदन बँक एक लाख, सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी संस्थेने 25 हजार आणि भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणेने 25 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहकार मंत्र्यांकडे सुपूर्द केला.

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, नागरी व पगारदार नोकरांच्या पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँक, सहकारी साखर कारखाने/सूत गिरण्या/ जिल्हा दूध संघ, गृहनिर्माण सहकारी संस्था, औद्योगिक, हातमाग व यंत्रमाग, उपसा सिंचन व इतर संस्था, फळे-भाजीपाला खरेदी विक्री प्रक्रीया संस्था आणि प्राथमिक दूध उत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन व पशुसंवर्धन संस्था अशा नऊ गटात खालील संस्थांना सहकार महर्षि, सहकार भूषण व सहकारनिष्ठ  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सहकार भूषण पुरस्कार ( पुरस्काराचे स्वरूप – 51 हजार रुपये व प्रशस्तीपत्र) 

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था – पुणे विभाग – अरुण विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या.चंदूर ता.हातकणंगले जि.कोल्हापुर. कोकण विभाग- नाटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.नाटे ता.राजापूर जि.रत्नागिरी.

नागरी पतसंस्था ग्रामिण बिगरशेती पतसंस्था पगारदार नोकरांच्या पतसंस्था:- कोकण विभाग- श्री.निनाईदेवी सहकारी पतसंस्था मर्या. मस्जिद, मुंबई-03 नाशिक विभाग- साईसेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर. पुणे विभाग- दि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप, क्रेडीट सोसायटी जि.ता.करवीर, जि.कोल्हापूर.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक : – कोकण विभाग- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी,

नागरी सहकारी बँका – कोकण विभाग- बॅसिन कॅथॉलिक को-ऑप बँक लि.वसई ता.वसई जि.पालघर, अमरावती- अभिनंदन अर्बन को-ऑप बँक मर्या.अमरावती जि.अमरावती.

सहकारी साखर कारखाने/सहकारी सूत गिरण्या/जिल्हा दूध संघ : पुणे विभाग – दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लि.माळेगांव बु.(शिवनगर) ता.बारामती जि.पुणे. औरंगाबाद- विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या.विलासनगर ता.जि.लातुर.

गृहनिर्माण सहकारी संस्था: कोकण विभाग- नवमिलन को.ऑप हौ.सोसायठी लि.डोंबिवली पूर्व.जि.ठाणे व जलाराम पार्क हौसिंग सोसायटी लि.भांडूप (प.) मुंबई.

फळे भाजीपाला खरेदी विक्री, प्रक्रिया व ग्राहक संस्था: पुणे- हातकणंगले तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.पेठवडगांव ता.हातकणंगले जि.कोल्हापूर नाशिक – प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था मर्या.लोणी खुर्द ता.राहता जि.अहमदनगर

प्राथमिक दूध उत्पादक कुक्कुटपालन, मत्स्यपालन व पशुसंवर्धन संस्था: पुणे- सहकार महर्षि हणमंतराव दि.पवार सहकारी कुक्कुटपालन सोसायठी लि.फलटण ता.फलटण जि.सातारा, कोकण- महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ मर्या.मुंबई , मांडवी कोळीवाडा मस्जिद बंदर (प.) मुंबई, नाशिक- सिद्धेश्वर सहकारी दूध उत्पादक व्यावसायिक संस्था मर्या.अकोले ता.अकोले जि.अहमदनगर.

सहकार निष्ठ पुरस्कार ( पुरस्काराचे स्वरूप 25 हजार रुपये व प्रशस्तीपत्र)

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था :- नाशिक- सटाणा दक्षिण भाग विविध कार्यकारी सह.(वि) सेवा संस्था मर्या.सटाणा ता.बागलाण जि.नाशिक, नागपूर- नागभीड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.नागभीड जि.चंद्रपूर, अमरावती- नेरपिंगळाई विविध कार्य.सह.संस्था मर्या.नेरपिंगळाई ता.मोर्शी जि.अमरावती.

नागरी पतसंस्था ग्रामिण बिगरशेती पतसंस्था पगारदार नोकरांच्या पतसंस्था: नागपूर- कोलमाईन्स वर्कर्स क्रेडीट को-ऑप सोसायटी, मर्या.सावनेर, पाटणसांगवी माईन, ता.सावनेर जि.नागपूर, औरंगाबाद- धनश्री बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी ता.आष्टी जि.बीड, अमरावती- कल्पतरु कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.धामणगाव रेल्वे जि.अमरावती.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक:- नाशिक- दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि.अहमदनगर, नागपूर- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर

नागरी सहकारी बँका:- पुणे- भगीनी निवेदिता सहकारी बँक मर्या.पुणे, औरंगाबाद- वैश्य नागरी सहकारी बँक मर्या.परभणी जि.परभणी.

सहकारी साखर कारखाने/सहकारी सूत गिरण्या/जिल्हा दूध संघ: नाशिक- सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि.अमृतनगर ता.संगमनेर जि.अहमदनगर.

गृहनिर्माण सहकारी संस्था – सहकार निष्ठ पुरस्कार : कोकण- दि विजयनगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.अंधेरी (पू.) मुंबई, पुणे- सुविधा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.अशोकनगर खेड ता.जि.सातारा, नागपूर- कुकडे ले आऊट (एल.आय.जी.) को.ऑप हाऊसिंग सोसायटी लि. नागपूर ता.जि.नागपूर

औद्योगिक, हातमाग व यंत्रमाग, उपसा जलसिंचन व इतर संस्था: पुणे- श्री.अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था मर्या.व्हनाळी, साके-केनवडे-गोरंबे ता.कागल, जि.कोल्हापूर कोकण- महामुंबई छत्री उत्पादक सहकारी केंद्र लि.मुंबई कांजूरमार्ग (पु.) मुंबई.

फळे भाजीपाला, खरेदी विक्री, प्रक्रिया व ग्राहकसंस्था: कोकण- कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्या.कळवा, जि.ठाणे, नागपूर- चिमुर सहकारी तांदूळ गिरणी समिती मर्या.चिमुर ता.चिमुर जि.चंद्रपुर.

प्राथमिक दूध उत्पादक, कुक्कुटपालन, मत्स्यपालन व पशुसंवर्धन संस्था: अमरावती- अमृतधारा दुध उत्पादक सहकारी संस्था मर्या.खरबडी, ता.मातोळा जि.बुलढाणा, औरंगाबाद- गोकुळ दुध व्यावसायिक सहकारी संस्था मर्या.साखरेबोरगांव ता.जि.बीड

.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!