Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्री-विखे पाटील यांची बंद दरवाजाआड चर्चा

Share

मंत्रीमंडळ विस्तार 14 जूनला ?

मुंबई- राज्य मंत्रिमंडाळाचा विस्तार 14 जूनला होण्याची शक्यता आहे. या विस्तारापूर्वी राजकीय वर्तुळात भेटीगाठींना वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 4 बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर या नेत्यांनी कॅबिनेटच्या विस्ताराआधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

मंत्रिमंडळात सात जागा रिक्त आहेत. या जागा लवकरच भरल्या जातील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकीकडे भाजपाचे आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत असताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे चार बंडखोर नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांनी जवळपास अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चार बंडखोर नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बुधवारी किंवा गुरूवारी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!