Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

ना कुठली रांग, ना कुठला त्रागा; सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले ४ हजार ८०७ कोटी

Share

 मुख्यमंत्र्यांकडून सहकार, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत म्हणजेच आज दुपारी १२ वाजेपर्यंत १० लाख लाभार्थींचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ पत्रकार कक्षात पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी त्यांनी ही योजना विना अडथळा आणि गतिमान पद्धतीने सुरु केल्याबद्धल सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला,आणि माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास तसेच इतर अधिकारी व तंत्रज्ञांचे अभिनंदनही केले.

शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर अपलोड केलेली कर्जखाती ३५ लाख ८०९ आहेत. यात जाहीर झालेली कर्जखाती २१ लाख ८१ हजार ४५१ आहेत. पहिल्या यादीत २४ फेब्रुवारी रोजी ६८ गावांतील १५ हजार ३५८ कर्जखात्यांची खाती होती. दुसरी २८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. यामध्ये १५ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार कर्जखात्यांची नावे होती.

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, नाशिक या ६ जिल्ह्यांतील ५ लाख कर्जखात्यांची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत एकूण १० लाख ३ हजार ५७३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ७ लाख ६ हजार ५०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ४ हजार ८०७ कोटी रुपये रक्कम प्रत्यक्ष जमा करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!