Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

आम्ही भाजपपासून दूर गेलोय हिंदुत्वापासून नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share

अयोध्या | विशेष प्रतिनिधी 

आम्ही भाजपपासून दूर गेलो आहोत, हिंदुत्वापासून नाही. असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा लगावत पुन्हा पुन्हा अयोध्येला येणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रामलल्लांचे दर्शन घेण्याआधी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, राम मंदिर व्हावे हि तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आहे. राम मंदिरासाठी ट्रस्टला शिवसेनेकडून १ कोटी रुपयांची देणगी देण्यात येणार आहे. जेव्हा अयोध्येला येतो तेव्हा यश मला मिळते. गेल्या दीड वर्षांत तीन वेळा मी याठिकाणी आलो आहे.

थोड्या वेळाने मंदिरात जाणार व दर्शन करणार आहे. शरयू नदीची आरती करण्याची आज इच्छा होती पण कोरोना व्हायरस मुळे आरती रद्द केली आहे. परंतु आरतीसाठी पुन्हा येणार आहे.

आपण जेव्हा जेव्हा अयोध्येला येतो तेव्हा तेव्हा मनात राम मंदिराचा विचार असतोच. राममंदिर व्हावे हि तर बाळासाहेबांची होती. यासाठी फुल ना फुलाची पाकळी १ कोटी रुपयांची देणगी बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने देणार आहे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती आहे की, राम मंदिर तर होणार आहेच, परंतु याठिकाणी महाराष्ट्राचे भाविक श्रध्येने याठिकाणी येतील त्यांना निवासाची सोय व्हावी यासाठी आम्हाला जागा द्यावी याठिकाणी महाराष्ट्र भवन निर्माण करून याठिकाणी धार्मिक पर्यटनाला वाव देता येईल.

https://www.facebook.com/Shivsena/videos/224184272312353/

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!