Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

पालघरची घटना गैरसमजुतीतून; दोषींवर कडक कारवाई होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share

मुंबई | प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री दोन साधू आणि त्यांचा एक चालक यांची चोर समजून हत्या करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर अनेकजण सरकार काय करत असे प्रश्न विचारून राजकारण करू पाहत आहेत. मात्र, या घटनेतील ११० संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून जवळपास १०१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये नऊ अल्पवयीन असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्याला संबोधित करताना बोलत होते.

ते म्हणाले, घटना घडल्यानंतर काही वेळेतच जिल्ह्याचे एसपी मध्यरात्री १२.३० वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत जंगलातून १०० जणांना पकडले. पाच मुख्य आरोपी गजाआड केले आहेत.

ही घटना कुठेही धार्मिक वादातून नाही, तर गैरसमजातून झाली आहे. या घटनेतील दोषींना माफ करणार नाही. त्सेच्च दोन पोलिसांचे निलंबनदेखील करण्यात आले आहे.

या प्रकरणी उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा केल्यावाचून महाराष्ट्र शासन शांत बसणार नाही. या साधूंना सुरत येथे जावयाचे होते. त्यांना केंद्राशासीय प्रदेश असलेल्या दादरा आणि नगर हवेलीच्या सीमेपासून परत पाठविण्यात आले. यानंतर ते परत येत असताना दुर्गम भाग असलेल्या गडचिंचले परिसरात ही घटना घडली.

ही घटना पालघरपासून 110 किमी दूर अंतरावर घडली. दुर्घटना घडलेल्या गावात जाण्यासाठी चांगला रस्तादेखील नाही हे दुर्दैव. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयासोबत या घटनेच्या बाबत चर्चा झाली आहे. कुन्हीही याबाबत राजकारण न करता जनतेला भडकवू नये असे आवाहन त्यांनी केले.

जर दादरा नगर हवेली येथून परत न पाठवता पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले असते तर ही घटना घडली नसती. अतुल कुलकर्णी डीजी सीआयडी क्राईम यांच्याकडे घटनेची चौकशी सोपविण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. जवळपास १०० पेक्षा अधिक जन ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच त्यांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. का
रवाई करण्यात आली असून कोन्हीही आदळ आपट करण्याची गरज नाही असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे 

* राज्यात काही उद्योग सुरु करायला आज पासून आपण थोडी फार सुरुवात करतो आहोत, कालच्या सूचनांनुसार आपण हळू हळू हात पाय हलवायला सुरुवात केली आहेत.

* रुतलेले अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी हे सर्व सुरू केले आहे पण याचा अर्थ असा नाही की लोकडाऊन उठवलं आहे.

* जर सोशल डिस्टनस पाळलं गेलं नाही तर पुन्हा बंधन टाकले जातील.

* सहा आठवड्यात आपण जिद्दीने नाइलाजाने घरात बसले तसेच डॉक्टर, पोलीस, कर्मचारी, हे व्यवस्थित काळजीने काम करत आहेत.

* कोरोना विरुद्ध लढणे ही प्राथमिक लढाई आहेत. हे करत असताना काही लांच्छनास्पद घटना घडतात.

* काल दुपारनंतर अचानक सगळीकडे पालघर ची चर्चा सुरू झाले.

* पालघर प्रकरण हे घडलं 16 तारखेला.. मॉब लिंचिंग झाले. पालघर मध्ये दादरा नगर हवेली जवळ घडले.

* साधू लोकं हे लोकडाऊन मुळे इतर रस्ते शोधून जायला लागले. गुजरात मध्ये जात असताना त्यांना अडवले परत येताना त्यांची हत्या          झाली.

* दादरा नगर हवेली जवळ गड चिंचली गावात त्यांना अडवून रीतसर तक्रार केली असती तर वेगळं काही घडलं असत.

* दुर्दैवाने या गावात जायला देखील रस्ता नाही हे मान्य करायला हवं.

* पोलिसांवर हल्ला केला गेला, तेव्हा त्या साधूंसह सर्वांवर हल्ला झाला.

* घटना घडल्यावर रात्री पूर्ण अंधारात एस पी तिथे पोहचले आणि अंधारात आरोपींना पकडले. जवळपास 110 जणांना पकडले आणि 30       तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी आहे.

* मी जात पात धर्म काहीच बघत नाही. घटना घडली लगेच कारवाई करायला सुरुवात केली आहे.

* या घटनेचा तपास पूर्ण सीबीआय कडे देण्यात आलेला आहे.

* सीआयडीचे अतुल कुलकर्णी यांना या तपासासाठी नेमले आहे.

* कोणीही या घटनेला धार्मिक रंग देऊ नका.

* 100 पैकी 9 अल्पवयीन आहेत त्यांना सुधार गृहात ठेवले आहे .

* हे सरकार सर्व आरोपींना पकडल्याशिवाय शांत बसणार नाही.

* अमित शहा आणि योगीजी यांसोबत चर्चा झाली आहे मी त्यांनाही सांगितलं की मॉब लिंचिंग महाराष्ट्र मध्ये होऊ देणार नाही.

* महाराष्ट्र सरकारवर दाखवलेले विश्वास हेच सरकारच बळ आहे.

* सोशल मीडियावर आग लावणारे कोण आहेत त्यांना सुद्धा पकडण्यात येईल याबाबत अमित शहा यांसोबत बोललो आहे.

* पालघर प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!