Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रVideo : जीवनावश्यक उत्पादन निर्मिती कंपन्या सुरु राहणार, ओळखपत्र गरजेचे – उद्धव...

Video : जीवनावश्यक उत्पादन निर्मिती कंपन्या सुरु राहणार, ओळखपत्र गरजेचे – उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील कंपन्या सुरु राहतील, शेतकरी कामावर जाऊ शकतील, शेतमजूर मजुरीला जाऊ शकतील. त्यांना सहकार्य करा. जीवनावाश्याक्त उत्पादन निर्मिती करणारया कंपन्या, त्यांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या आपण बंद ठेवणार नाही आहोत.

- Advertisement -

या कंपन्यांची ओळख असलेले नाव कर्मचाऱ्यांनी गाडीवर टाकावे, तसेच कंपनीचे ओळखपत्र सोबत ठेवावे यामुळे तुम्हाला घराबाहेर पाडण्यात कुणी थांबविणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

घटना गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारने केलेल्या सहकार्याचे कौतुक केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज घेतलेल्या कर परताव्याबाबतच्या निर्णयाचे ठाकरे यांनी कौतुक केले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

  • जनतेचे सहकार्य वाढते आहे त्याबद्दल धन्यवाद
  • केंद्र सरकारचे धन्यवाद
  • देशांतर्गत विमानसेवा बंद होता आहे
  • कर परतावा तारीख लांबविल्या आहेत
  • अजूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत
  • संकटाचे गांभीर्य लक्षात घ्या
  • हा व्हायरस जिथे पोहोचला नाही तिथे पोहोचू द्यायचा नाही
  • जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत
  • जीवनावश्यक वस्तूंची सेवा ची अडवणूक होऊ नये
  • शेतमजूर, रोजंदारीची कामे यांना अडविले जात नाहीये
  • शहरातील जीवनावश्यक वस्तूंची ने-आण थांबविले नाही
  • जीवनावश्यक वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या सुरू राहणार
  • आपल्या वाहनावर कंपनीचे नाव, ओळखपत्र सोबत असावे
  • आपणही समजुतीने घ्या
  • नागरिक महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असतील तर त्यांना सहकार्य करा
  • घरात राहा सुरक्षित राहा
  • नागरिकांना अडचण असेल, तर १०० नंबरवर कॉल करा
  • पोलिसांना धन्यवाद द्यायचे आहेत, गेल्या काही दिवसांत चांगली कामगिरी त्यांनी केली आहे
  • काळाबाजार, साठेबाजी होता कामा नये
  • खाद्याचा पुरेसा साठा आहे
  • वितरण व्यवस्था सुरळीत राहणार आहे
  • सिद्धिविनायक संस्थान
  • साई संस्थान पुढे येऊन मदतीला उतरले आहे
  • रक्तदान होत आहेत
  • संकट आल्यानंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे
  • लालबागच्या राजा मंडळाने हा उपक्रम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो
  • संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे
- Advertisment -

ताज्या बातम्या