Video : भोंगा वाजलाय! युद्ध सुरु झालंय..गर्दी करू नका; सूचना पाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी 

करोना व्हायरसचा शिरकाव सर्वत्र झाला आहे. राज्यातील करोना बाधितांची संख्या आता 47 वर पोहोचली असून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

कोरोना ग्रस्तांची वाढलेली संख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच ‘लॉक डाऊन’सारखा एखादा मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ते राज्याला आज सकाळी संबोधित करत होते.

ते म्हणाले, घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही. हे विषाणूंशी युद्ध आहे. युद्धाचा भोंगा वाजलाय युद्धाच्या काळात रात्री दिवे घालवले जायचे. शत्रूला आपली माहिती कळू नये म्हणून काळजी घ्यावी लागली.

लोकल ट्रेन आणि बसमधली गर्दी कमी झाली आहे, पण ती पूर्ण बंद व्हायला हवी याबाबत काळजी घेतली गेली पाहिजे. कोरोनाचा विषाणू हळुहळू एक-एक पाऊल पुढे टाकत आहे त्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली पाहिजे.

कोरोनाचे संकट जात-पात-धर्म पाहत नाही. सगळ्यांनी एकजुटीने लढायला हवे. सरकार सर्व काही बंद करू शकते पण तसे करायचे नाही तशी आमची इच्छाही नाही. कृपा करा आणि ट्रेन-बसची गर्दी कमी करा. घराबाहेर कुणी पडू नका.

केंद्राकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. केंद्राने महारष्ट्रा सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री संपर्कात आहेत. पंतप्रधान स्वतः या संकटात लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे म्हणत पंतप्रधानांसह आरोग्यमंत्र्यांचे कौतुक ठाकरे यांनी केले. अविरात सेवा देणारे पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी, नर्स यांचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *