Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणार्‍या शर्मिला येवलेविरुद्ध गुन्हा दाखल

Share

अकोले (प्रतिनिधी)- मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणार्‍या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची प्रदेश उपाध्यक्ष शर्मिला सुभाष येवले हिच्या विरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात भादंववि कलम 336, 186 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पो. कॉ. सचिन शिंदे यांनी यासंदर्भात तक्रार दिली. मुख्यमंत्री शुक्रवारी सकाळी 11 वाजता अकोलेत महाजनादेश यात्रेनिमित्त संगमनेरहून अकोलेकडे येत असताना शहरापासून जवळच असणार्‍या रोकडोबा मंदिराजवळ शर्मिला येवले हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर शाईफेक केली होती. रस्त्यावर येऊन तिने ‘सीएम, गो बॅक’ आशा घोषणा देत ताफ्यातील एका गाडीवर प्लॅस्टिक पिशवीमध्ये ठेवलेली शाई फेकली.

त्यानंतर शर्मिला येवले तेथून गायब झाली होती. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा शर्मिला सुभाष येवले (रा. इंदोरी, ता. अकोले) हिच्याविरुद्ध महनीय व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात आणणे व लोकसेवक सार्वजनिक कार्य पार पाडीत असताना त्यांना अटकाव करणे या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!