मोदी लाटेला घाबरून पवारांनी मैदान सोडले

0

मुख्यमंत्री : राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणे मनोरंजन

कर्जत (वार्ताहर) – मोदींच्या लाटेला घाबरून पवार साहेबांनी मॅच सुरू होण्यापूर्वीच मैदानातून पळ काढला. त्यांनी पळ काढला त्याचवेळी देशात मोदी सरकार परत येणार असल्याचे सिद्ध झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कर्जत येथे प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे व महायुतीचे नेते उपस्थित होते. शरद पवार यांचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ओघ आमच्याकडे आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली की पवार राज्याचे कॅप्टन म्हणून पॅड बांधून मैदानात उतरले. मात्र मोदी लाट पाहून ते मॅच न खेळताच आउट झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणे म्हणजे फक्त मनोरंजन आहेत. नगर जिल्ह्यास पूर्वी मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणी पुुरवण्यासाठी लागत होते. आता अवघे 400 टॅकर दुष्काळात सुरू आहेत.

आम्ही मत नव्हे, मन जिंकतो : मुंडे
सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र आले की काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पोटात दुखते. जातिधर्मांत आणि कुटुंबात भांडणे लावण्याच्या पलीकडे त्यांनी काही केले नाही. आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांचे मत जिंकण्यापेक्षा त्यांचे मन जिंकतो, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. शेवगाव येथे झालेल्या सभेत मुंडे बोलत होत्या. मुंडे म्हणाल्या, महात्मा गांधी यांचे नाव घेणार्‍यांना गांधीजींचे विचार कळले नाहीत. त्यांना फक्त नोटेवरील गांधीजी ओळखता येतात. दुष्काळी स्थितीमध्ये सरकारने राज्यात सर्वाधिक छावण्या सुरू केल्या आहेत. वंचितांसाठी काम करणारा इथे बसलेला प्रत्येकजण मुंडे यांचा वारसदार आहे, असे त्यांंनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*