Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

जेएनयुमधील भ्याड हल्ल्याने मुंबईतील २६/११ ची आठवण करून दिली – मुख्यमंत्री

Share

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेला भ्याड हल्ल्याने मला २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तोंड झाकून हल्ला करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे तसेच हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाईदेखील गरजेची असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात हे कदापि खपवून घेतले जाणार नाही वेळ पडल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत अधिक वाढ केली जाईल असेही ते म्हणाले.

हल्ला करणारे डरपोक होते, बुरखा परिधान करून त्यांनी हल्ला केला,  या हिंसाचाराचं कधीच समर्थन होऊ शकत नाही. हा हल्ला पाहिल्यानंतर मला २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाल्याचे ठाकरे म्हणले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!