राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी केला निधी मंजूर

0

ना. शिंदे, आ. कर्डिले, रावसाहेब चाचा तनपुरे, शिवाजीराव सोनवणेंच्या शिष्टमंडळाला यश

 

राहुरी ़(प्रतिनिधी) – राहुरी शहराचा रखडलेला पाणी प्रश्‍न व ग्रामिण रूग्णालयाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आ. शिवाजी कर्डिले, यांच्यासह रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे यांच्यासमवेत पालिका प्रशासनाचे विरोधी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 

मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण रूग्णालयासाठी 17 कोटी व शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 27 कोटी रुपये उपलब्ध करण्याचे आदेश दिल्याने आता राहुरीकरांना तब्बल 52 कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी नगरसेवकांच्या प्रयत्नाला यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

आ. शिवाजी कर्डिले, परिवर्तन मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे, विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे, रूद्राक्ष युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष नितीन तनपुरे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डौले, नगरसेवक शहाजी जाधव, सोन्याबापू जगधने, डॉ. धनंजय मेहेत्रे, योगेश देशमुख, विक्रम भुजाडी, अशोक घाडगे, गणेश खैरे, ज्ञानेश्‍वर पोपळघट, अतिक बागवान, भाऊसाहेब काकडे, सुभाष वराळे, प्रदीप भुजाडी आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.

 

 

यावेळी राहुरीच्या पाणी प्रश्‍नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठ्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने 27 कोटी 23 लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दिला. तर यावेळी राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयाच्या प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यात आली.

 

ग्रामिण रूग्णालयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामिण रूग्णालयासाठी 17 कोटी रुपये मंजूर केले. हा निधी आगामी डिसेंबरमधील अधिवेशन काळात उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. कर्डिले व त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

 

 

राहुरी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत विस्कळीत झाला आहे. तर ग्रामीण रूग्णालयाचीही दैन्यावस्था झाली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा व ग्रामिण रूग्णालयाचा प्रश्‍न राहुरी शहराच्या दृष्टीने महत्चाचा आहे. दोन्ही प्रश्‍नांचे गांभीर्य पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवित निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने राहुरी शहराला तब्बल 52 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यामुळे राहुरी शहराचा पाणी व आरोग्याचा प्रश्‍न कायमचा मार्गी लागणार आहे. यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व आमदार कर्डिले यांचे भरीव सहकार्य मिळाले आहे. त्यातच परिवर्तनचे मंडळाच्या नगरसेवकांनीही याप्रश्‍नी आक्रमक भूमिका घेतल्याने पाणी पुरवठ्याचा व ग्रामीण रूग्णालयाच्या निधीला चालना मिळाली आहे.
                     -रावसाहेब चाचा तनपुरे, परिवर्तन आघाडीचे नेते, राहुरी.

LEAVE A REPLY

*