समृद्‌धी’ची बैठक मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलली; शेतकरी नेत्यांची नाराजी

0

नाशिक, ता. १३ :  समृद्‌धी महामार्गासंदर्भात संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे ढकलल्याने शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

समृद्धी महामार्गाच्या संदर्भात संघर्ष समितीच्या शेतकऱयांशी चर्चा करण्यासाठी उद्या दिनांक १४ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता,(सहयाद्री अतिथीगृह,मलबार हिल,मुंबई) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खा. शरद पवार यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही बैठक पुढे ढकलल्याचे दूरध्वनीद्वारे खा. पवार यांच्या कार्यालयात कळविले. तेथून शेतकरी व नेत्यांना बैठक रद्द झाल्याचे समजले.

मुख्यमंत्र्यांनी तारीख दिली तेव्हा राष्ट्रपती निवडणूक कार्यक्रम निश्चित होता. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार साहेब, डॉ भालचंद्र कांगो यांच्यासह समृद्धी बाधित शेतकऱ्यांना अशी वागणणूक मिळणे अपेक्षित नव्हते अशी नाराजी बबन हरणे, राजू देसले यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*