आठवड्याभरात भारनियमन पूर्वपदावर आणा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0
मुंबई | कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होऊन राज्यातील काही भागात भारनियमन करावे लागत, असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका उच्चस्तरीय बैठकित बोलतांना येत्या 7 दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भातील सूचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे.

ऊर्जा विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

केंद्रीय कोळसा मंत्रालय, कोल इंडिया लिमिटेड, विविध कोळसा कंपन्या,राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीतील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. परिणामी काही भागात भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे एकूणच कोळसा उत्पादन,त्याची वीज प्रकल्पापर्यंतची वाहतूक असा समग्र आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. कोळशाचा पुरवठा तत्काळ सामान्य करून तो वीज प्रकल्पांपर्यंत नियमित स्वरूपात कसा पोहोचेल, यासाठी उचित दिशानिर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

कुठल्याही स्थितीत येत्या 5 ते 6 दिवसांत वीज निर्मिती पूर्वपदावर येईल आणि सर्वसामान्यांना भारनियमनाचा त्रास होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

गरज भासल्यास कोळशाची काही वाहतूक रस्त्याने सुद्धा करा,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. रेल्वेने सुद्धा या काळात अतिरिक्त व्यवस्था उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले.

बैठकीस अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, केंद्रीय  कोळसा मंत्रालयाचे सह सचिव आर. के. सिन्हा, महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (सिएमडी) बिपीन श्रीमाळी, महापारेषण चे सीमडी राजीव मित्तल, महावितरण चे सिएमडी संजीव कुमार , महा कोल इंडिया लि. चे संचालक (मार्केटिंग) एस. एन. प्रसाद, वेस्टर्न कोल फिल्ड चे सीएमडी आर. आर. मिश्रा, रेल्वे मंत्रालयाचे ए. के. गुप्ता, मुंबई येथील महाव्यवस्थापक (ऑपरेशन) अजित कुमार जैन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*