शिर्डी, धुळे विमानतळ विकासाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

0

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 59वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज संपन्न झाली.

या बैठकीत एकूण 27 विषयांवर चर्चा करण्यात आली. शिर्डी, पुरंदर, बेलोरा, कराड, मोरवा, सोलापूर, धुळे या विमानतळाच्या विकासकामाबाबतचा आढावा घेण्यात आला.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितिन करीर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी व इतर अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*