Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

मुख्यमंत्री ठाकरे आज अयोध्येत; रामलल्लाचे दर्शन घेणार, शरयू आरती सोहळा रद्द

Share

अयोध्या।  विशेष प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहपरिवार शनिवारी (दि.7) अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. या ठिकाणी होणारा शरयू आरती सोहळा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या दौर्‍याला विरोध लक्षात घेता या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ते या ठिकाणी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठाकरे यांच्या स्वागताची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ठाकरे यांच्या मार्गावर स्वागताचे ठिकठिकाणी पोस्टर लावून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे अयोध्येत तळ ठोकून असून तयारीच्या सर्व घडामोंडींवर बारिक लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्रासह देशभरातील शिवसैनिक रेल्वेने अयोध्येत दाखल झाले आहेत. शनिवारी सेना नेते एकनाथ शिंदेसह मुंबई व ठाण्याच्या शिवसैनिकांचा जत्था या ठिकाणी पोहोचला आहे.

शिवसैनिकांच्या गर्दीमुळे अयोध्येतील सर्व लॉज, हॉटेल व धर्मशाळा बुक झाल्या आहेत. शनिवारी ठाकरे दुपारी 4.30 वाजता लखनौहून अयोध्येला येतील. पहिले ते पत्रकारांधशी संवाद साधतील, नंतर दर्शन घेतील. पुढे साधू महंताशी चर्चा करून मुंबईकडे प्रयाण करतील.


ताफा अडविण्याचा इशारा

तपस्वी आखाड्याचे महंत परमहंसदास महाराज यांनी ठाकरे यांच्या दौर्‍याला विरोध दर्शविला आहे. ठाकरेंचा ताफा अडवणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. ठाकरे यांच्या मार्गावर ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..


‘करोना’मुळे शरयू आरती रद्द

ठाकरे हे सायंकाळी शरयूची आरती करणार होते. मात्र करोना व्हायरसमुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!