Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

राज्यभरात संचारबंदी लागू, राज्याच्या सीमा सील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

राज्यातील गर्दी कमी होत नसल्यामुळे अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे. राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित करताना माहिती दिली.

ज्या शहरात कोरोना संशयित रुग्ण आहेत किंवा कोरोन पोझीटिव्ह रुग्ण आहेत त्या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात येणार आहे. या शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात जाता येणार नाहीये.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील. शेतीपयोगी खते, बी बियाणे वाहतूक सुरु राहील. औषधे बनविणाऱ्या कंपन्या, कंपन्यांची वाहतूक या गोष्टी सुरु राहणार आहेत.

मुख्यमंत्री पत्रकार परिषदेतील मुद्दे

सरकारची कामगिरी चांगली आहे

कालचा दिवस जो होता त्याचे पालन सर्वांनी केल्याबाबत धन्यवाद

महाराष्ट्र कोरोना व्हायरस च्या निर्णायक टप्प्यावर

टाळ्या वाजवल्या म्हणजे व्हायरस गेला असे नाही

राज्यात संचारबंदी लागू करावी लागणार आहे

मौज मजा करण्याचे सध्याचे दिवस नाहीत

चार किंवा पाच पेक्षा अधिक जण एकत्र जमता कामा नये

जीवनावश्यक वस्तू सुरु राहतील

जिल्ह्याजिल्ह्याच्या सीमा सील होणार आहे

कोरोना व्हायरस जिथे पोहोचला नाही तिथे पोहोचू द्यायचा नाही

देशांतर्गत विमानसेवा तात्काळ बंद करावी असे पंतप्रधान यांना पत्र लिहिले आहे.

अन्नधान्य, औषधे, औषधांचे कारखाने याची वाहतूक हे सगळे सुरु राहील

बेकरी सुरु राहील

पशु दवाखाने सुरु राहतील

कृषी उद्योग : बी बियाणे, खते खाद्यांची वाहतूक सुरु राहील

सर्व प्रार्थना स्थळे बंद राहतील

पुजारी धर्मगुरू, मौलाना हेच फक्त धार्मिक स्थळांवर प्रवेश असेल बाकी सर्वांसाठी बंद असेल

बस अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाते आहे.

रिक्षा चालक आणि एक

टॅक्सी मध्ये चालक आणि दोघे अशी परवानगी असेल

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!