Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्री फडणवीस उद्या कोपरगावात

Share

कोपरगाव (प्रतिनिधी)- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजप, सेना, रिपाइं, रासप महायुतीच्या उमेदवार आ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा उद्या शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर आयोजित केली असल्याची माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.
श्री. कोल्हे म्हणाले की, राज्यात भाजपा-सेना महायुतीचे शासन पुन्हा सत्तेवर यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार प्रचाराची रणधुमाळी सांभाळत आहेत. गेल्या पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आ. स्नेहलता कोल्हे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे पक्षाने पुन्हा विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी सकाळी कोपरगावी येत आहेत.

तरी जास्तीत जास्त मतदारांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाचे प्रांतीक सदस्य अ‍ॅड. रवींद्र बोरावके, तालुकाध्यक्ष शरद थोरात, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, कैलास जाधव, तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे, रिपाइंचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, रासपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, भाजपा महिला तालुुकाध्यक्षा योगीता होन यांच्यासह सर्व मित्रपक्ष पदाधिकार्‍यांनी केले आहे.

बिपीन कोल्हे म्हणाले की, कोपरगाव विधानसभा मतदार संघात रस्ते, वीज, पाटपाणी, आरोग्य यासह विकासात्मक कामांवर भर असून उर्वरित कामासाठी मोठ्या प्रमाणात सर्वच घटकांचे सहकार्य मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांना दिशा देऊन त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!