Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

छत्रपतींच्या प्रेरणेतून सरकारची वाटचाल

Share

मुख्यमंत्री फडणवीस \\ काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेचा विसर

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – छत्रपतींच्या प्रेरणेतून सरकारची वाटचाल सुरू आहे. छत्रपतींचे वंशज असलेले संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे सर्व भाजपमध्ये आले आहेत. उदयनराजे यांनी तर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी मिळालेल्या खासदारपदाचा राजीनामा दिला. जनताच आमच्यासाठी दैवत असून, काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेचा विसर पडला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाजनादेश यात्रेनिमित्त काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील बाजारतळाजवळ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपतींची प्रेरणा घेऊन आम्ही काम करीत आहोत. त्यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊऩ भाजपमध्ये प्रवेश केला. अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उदयनराजे भाजपमध्ये आले. छत्रपतीचे वंशज संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे भाजपमध्ये आले आहेत. राज्यातील 12 कोटी जनता हे आमचे दैवत आहे.

त्यांच्या दर्शनासाठी, आशीर्वादसाठी महाजनादेश यात्रा आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यात्रेस राज्याने प्रचंड प्रतिसाद दिला. सामान्य माणसाचा विसर राष्ट्रवादीला पडला. आपण परिवर्तन करण्याचे काम केले. ईव्हीएमवरच 2014 पर्यंत निवडणूक झाल्या. आता मात्र ईव्हीएम वाईट असल्याचा साक्षात्कार राष्ट्रवादीला झाला. 15 वर्षाच्या यांच्या कारभाराच्या दुप्पट काम भाजपा सरकारने केले. सर्व प्रकारचे अनुदाने दिले. पन्नास हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात दिले. बंद प्रकल्प सुरू केले. नगर-दौंड रस्ता झाला. पालिकेला 33 कोटींचा निधी दिला. 2022 पर्यंत प्रत्येक गरिबाला घर, वीज, शौचालय देणार, असे त्यांनी सांगीतले.

‘साकळाई’ला पैसे देणार
कुकडी प्रकल्पाच्या माणिकडोह बोगद्याला मंजुरी दिली. नगर अणि श्रीगोंदा तालुक्यांतील दुष्काळी गावांना साकळाई योजनेसाठी पैसे कमी पडू देणार नाही. साकळाईसाठी लागेल तेवढा पैसा मिळेल. वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात आणून पुढील पाच वर्षांत दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मंत्री मी; पण काम ‘ते’ करायचे
पवारांनी आपल्या बिगरकामाचा मंत्री करून ठेवले होते, अशी टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केली. आपण 42 वर्षे राजकारण करीत आहोत, पण असा मुख्यमंत्री झाला नाही. सहा वेळा आमदार आणि पाच वेळा मंत्री झालो. पण आपला वापर सह्याजीराव म्हणून झाला. सर्व काम तेच (पवार) करायचे, असा निशाणा त्यांनी साधला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!