Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

यात्रा काढणे ही भाजपाची परंपरा- मुख्यमंत्री फडणवीस

Share

पाथर्डी (प्रतिनिधी)- सत्ता नसतांना संघर्ष यात्रा तर सत्तेत आसताना संवाद यात्रा काढुन आम्ही जनतेपर्यंत पोहचतो. महाजनादेश यात्रा ही जमतेशी संवाद साधण्यासाठी व आर्शीवाद घेण्यासाठी काढली आहे. गेल्या 15 वर्षात एकही यात्रा न काढणार्‍या विरोधकांची माजोरी आणि मुजोरी एवढी वाढली आहे की त्यांनाही आता यात्रा काढण्याची वेळ आली आहे. राज्यात विरोधकांचे अस्तित्व कोठेही शिल्लक राहिलेले नाही अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमीत्त पाथर्डी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजीत सभेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रा.राम शिंदे, महाजनादेश यात्रेचे राज्य समन्वयक आ. सुरजितसिंह ठाकुर, आमदार शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, माजी खा. दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे, प्रदेश भाजपा कार्यकारीणी सदस्य अशोक चोरमले, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपस्थित होते.

मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टरने कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. वृध्देश्वर कारखान्याचे अध्यक्ष माजी आ. आप्पासाहेब राजळे यांचे अभिष्टचिंतन करून तिसगाव आमदार शिवाजी कर्डीले यांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले. ग्रामस्थांच्या वतीने तिसगाव येथे स्वतंत्र पोलिस ठाणे मंजुर करण्याबाबत निवेदन देण्यात आले. पाथर्डी शहरात मुख्यमंत्र्याचे आगमन झाल्यावर रोड शो, रॅलीद्वारे भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!