Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

महाजनादेश स्टॉप…

Share

अकोले, संगमनेर, राहुरी, नगरमधील सीएमच्या सभा रद्द

अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नगरमधील उद्याची महाजनादेश यात्रा स्थगित झाली आहे. तसा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाने कळविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अकोले, संगमेनर, राहुरी आणि नगर येथील सभा रद्द झाल्याची माहिती पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा उद्या रविवारी नगर जिल्ह्यात येणार होती. या दौर्‍यात संगमनेर, शिर्डी, राहुरी आणि नगर येथे सभांचे नियोजन होते. नगर येथे मुक्कामी राहून मुख्यमंत्री फडणवीस आगामी विधानसभा निवडणुकीचा ‘होमवर्क’ करणार होते. दुसर्‍या दिवशी यात्रा पाथर्डी, जामखेड मार्गे बीड जिल्ह्यात जाणार होती.भाजपसह पोलीस प्रशासनानेही त्याची तयारी पूर्ण केली होती. सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचा बंदोबस्त रवाना करण्यात आला. महापालिकेनेही रस्ते चकचकीत करून खड्डे बुजविले. ज्या मार्गावरून महाजनादेश यात्रा जाणार होती, त्या मार्गावर स्वागत कमानीसह होर्डिग्ज लागले होते. तयारी पूर्ण होऊन महाजनादेशाची वाट पाहणार्‍या नगरकरांना मात्र रद्दचा निरोप पोहचला.

सोमवारसाठी ट्राय
मुख्यमंत्री फडणवीस हे जेटली यांच्या अत्यंसंस्कारासाठी दिल्लीत जाणार असल्याने उद्या रविवारचे त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले. रविवारची नगर येथील रद्द झालेली सभा सोमवारी सकाळी तर दुपारनंतर पाथर्डी येथे ठरलेल्या वेळापत्रकानुसार महाजनादेश यात्रा सुरू होण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय समजला नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!