Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या अर्जावरचे आक्षेप फेटाळले

Share

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जावरचे सगळे आक्षेप निवडणूक अधिकार्‍यांनी फेटाळले आहेत. देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या वेळी डॉ. आशिष देशमुख, प्रशांत पवार आणि इतर उमेदवारांनी याबाबत हरकत उपस्थित केली. ज्यामध्ये फडणवीस यांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दाखल केलेल्या नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र हे नोटरी समक्ष सादर केले आहे. त्याची मुदत 28 डिसेंबर 2018 रोजी संपली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच प्रतिज्ञापत्राच्या सीलवर 28 डिसेंबर 2018 ही तारीख आहे. तर नोटरीच्या आडव्या शिक्क्यावर 3 ऑक्टोबर 2010 ही तारीख नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे शपथपत्र अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच फडणवीस यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरवून ते स्वीकारु नये अशी मागणी करण्यात आली होती.

याबाबत फडणवीस यांचे निवडणूक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी उपरोक्त नमूद पुरुषोत्तम मोरेश्वर सोनटक्के यांच्या व्यवसाय प्रमाण पत्राची प्रत आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी हरकत उपस्थित झाल्यावर केली आहे. सदर व्यवसाय प्रमाणपत्राला 29 डिसेंबर 2018 पासून पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे हे दिसून आले. नामनिर्देशन पत्रासोबत नमुना 26 मधील प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं आहे. तसेच संबंधित नोटरीचीही मुदतवाढ करण्यात आली आहे. याबाबत खात्री झाल्याने हरकतदार आणि हरकतीत तथ्य नसल्याचं निवडणूक अधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!