Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपालांकडे राजीनामा

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!