Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

तुमची मानसिकताच राजेशाही म्हणून तुम्हाला जनतेने घरी बसवलं – फडणवीसांचा पवारांना टोला

Share

नाशिक | प्रतिनिधी 

मुख्यमंत्र्यांनी महाजानादेश यात्रेच्या समारोपाप्रसंगी शरद पवार यांना लक्ष्य करत तुमची मानसिकताच राजेशाही आहे; त्यामुळेच तुम्हाला जनतेने घरी बसवले असल्याचे म्हणत टोला लगावला आहे.

आज नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा महासमारोप पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना लक्ष्य करत तोंडसुख घेतले.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जनतेला गेल्या पाच वर्षांचा हिशेब द्यायला निघालो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांना डिवचत म्हटले की, हिशेब देणे चांगली गोष्ट आहे, फार पूर्वी आमच्याकडे खतावणी लिहिणारे असायचे असे म्हणत फडणवीस यांना चिमटा काढला होता.

दरम्यान आज महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने हेविवेट नेत्यांसमोर फडणवीस यांनी शरद पवारांना लक्ष्य करत तुमची मानसिकताच राजेशाही आहे त्यामुळेच तुम्हाला जनतेने घरी बसवले असल्याचे म्हणत टीका केली.

ते म्हणाले, राज्यभरात उदंड महाजनादेश यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात महिलांच्या डोळ्यात आता आनंदाश्रू आहेत. पूर्वीच्या सरकाच्या काळात चुलीतून निघणाऱ्या धुरातून महिलांना अश्रू पुसावे लागायचे आज आनंदाश्रू आहेत.

सरकारने घराघरात वीज, गॅस पोहोचवला आहे. ते म्हणाले, जनतेच्या दर्शनाची यात्रा म्हणजे महाजनादेश यात्रा होती. राज्यात जिथे गेलो तिथे मोठा प्रतिसाद जनतेने दिला. सांगली साताऱ्यातील जलप्रलयासाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्याने मदत केली. साडेतीन कोटींचे चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्राप्त झाले. राज्यातील जनतेने त्यांच्या सेवकांना सेवा करण्याची संधी दिली असून यापुढेही असाच आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा आगामी निवडणुकीमध्ये साथ द्या असे आवाहनदेखील केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!