Type to search

Featured सार्वमत

मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेल्या तक्रारी दोन दिवसांत निघणार निकाली!

Share

पिण्याच्या पाण्यासंदर्भात सर्वाधिक सूचना सरपंचांंना कार्यवाहीची प्रतीक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 60 सरपंचांनी दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑडियो ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी सरपंचांनी पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या छावण्यासंदर्भात सर्वाधिक तक्रारी केल्या. सर्व तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसांत या तक्रारी आणि प्रश्‍न निकाली काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे या तक्रारींवर काय कार्यवाही होते आणि प्रश्‍न कसे मार्गी लागतात, याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

दुष्काळाची स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भातील संवादामध्ये शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ऑडियो ब्रीजच्या माध्यमातून अहमदनगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील 60 सरपंच ऑडियो ब्रीजवर ऑनलाईन होते. या महसूल प्रशासनातील रोहयो, टंचाई, जिल्हा परिषदेच्या 14 विभागांचे प्रमुख आणि तालुकास्तरावर अधिकारी हे मुख्यमंत्री आणि संबंधित शेतकरी यांच्यातील संवाद ऐकत होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!