सीएम चंद्रबाबू नायडूंचे पीएम मोदींविरोधात दिल्लीत उपोषण

0
नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आज दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा आणि राज्य पुनर्रचना कायदा २०१४ अंतर्गत केंद्राद्वारे देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागण्यांसाठी ते उपोषणाला बसत आहेत.

आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. आंध्रचे विभाजन झाल्याने तसेच विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाल्याने चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम केला होता. तेलुगू देसम पक्षाने दिलेल्या माहितीनुसार उपोषण रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. उद्या (ता.१२) ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सुद्धा देणार आहेत.

 

LEAVE A REPLY

*