Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

युती अभेद्य! पंधरवड्यात जागा वाटप निश्चित – मुख्यमंत्री

Share

मुंबई | प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती अभेद्यच राहणार असून पुन्हा एकदा राज्यात महायुती विक्रम मोडीत काढून मोठ्या संख्येने विजयश्री प्राप्त करेल असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. येत्या पंधरवड्यातच जागा वाटपाचा निर्णय मार्गी लागेल असेही ते याप्रसंगी म्हणाले. आज मुंबईत एका सोहळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदारांनी भाजपत जाहीर प्रवेश केला यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत संशय निर्माण करणाऱ्या बातम्या खोट्या आहेत. युती अभेद्यच आहे आणि राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

येणाऱ्या काळात सेनेच्या जागा भाजपकडे येतील तसेच भाजपच्या जागा सेनेला सोडाव्या लागणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!