नाशिक-मुंबई महामार्गावरील खारेगाव टोलनाका बंद

0
नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर ठाण्यामधील खारेगाव टोलनाका मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. वसुली पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेला हा राज्यातील पहिला टोलनाका आहे.

1998 साली उभारण्यात आलेला हा टोलनाका रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्यामुळे बंद करण्याचे आदेश गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत हा टोलनाका बंद करण्यात आला आहे.

१९९८ पासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीचे 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते मात्र त्यापेक्षा अनेक पटींनी पैसे वसूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*