Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

गुजरातमध्ये हाय अलर्ट; वायू वादळ धडकण्याची शक्यता

Share

मुंबई : राज्यातील वातावरणात बदल होत असून पुढील २४ तासांमध्ये गुजरातच्या किनारपट्टीवर ‘वायू’ हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. ताशी १३० ते १३५ किमी वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.

दरम्यान या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोणतीही अनुचित घटना घडूनये म्हणू वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याचे पाण्याची सेवा सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये उद्यापर्यंत (दि. १३) हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच गुजरात प्रशासनाने आपत्कालीन नियंत्रण कक्षेलाही सतर्क राहण्याचे देण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या २६ टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी १० टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत.

याव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच हेलिकॉप्टर्समधूनही परिस्थितीची पाहणी सुरू करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा फटका गुजरातसोबतच महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने गृहमंत्रालयाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच हवामान खात्याने सौराष्ट्र आणि किनारपट्टीजवळील भागांमध्ये १४ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वायू चक्रीवादळाचा मान्सूनवरही प्रभाव पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!