Type to search

Breaking News नाशिक फिचर्स मुख्य बातम्या

धक्कादायक तापमानवाढीमुळे समुद्र होतोय विषारी

Share

नाशिक : सध्या संपूर्ण जगाला तापमानवाढीचा प्रश्न सतावत आहे. जनजागृतीसाठी जगभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. तापमानवाढीमुळे अंटार्टिका मधील ग्लेशियर वितळत चालले आहे.

सागरी हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी म्हटले आहे कि, बर्फ असल्याने समुद्राचे तापमान वाढत आहे. त्यामुळे पाण्यात विषारी शैवलांची संख्या वाढत आहे. याचा परिणाम पक्षी आणि सागरी जीवांवर होत आहे. आर्क्टिक ध्रुवावर ३० वर्षांमध्ये बर्फाची जाडी ९५ टक्क्यांनी कमी झाली आहे.

हवामान बदलाचे अनेक प्रतिकूल परिणाम जगा आहेत. एका ठिकाणी खूपच थंडी दुसरीकडे खूप तापमान दिसून येत आहे. यास मानव देखील तितकाच कारणीभूत आहे. त्यामुळे हवामान बदलामुळे आता ग्लेशियर वितळण्यास झाली आहे.

वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की फ्रान्समधील ग्लेशियर पेक्षा मोठे असलेले अंटार्क्टिकामधील ग्लेशिअर खूप जलदगतीने वितळताना दिसत आहेत. हा विशाल ग्लेशियर आतापर्यंत अनुमानांपेक्षा अधिक वेगाने वितळण्याची शक्यता आहे. जर असे घडले तर समुद्र पातळी खूप वाढेल,आणि मानवजातीसाठी ती अत्यंत अत्यंत चिंताजनक बाब असणार आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, टोटेन ग्लेशियर हा अंटार्टिका मधील सर्वात वेगवान आणि सर्वात मोठा हिमनग आहे. शास्त्रज्ञांनी म्हटले कि काही दिवसांच्या निरीक्षणानंतर असे लक्षात आले कि, हा ग्लेशियर तापमानामुळे वितळत असून तो लवकरच करणार आहे. हिवाळ्यात हे हिमनग वितळण्यास सुरवात होते. त्यामुळे परिणामी समुद्राची पातळी वाढत जाते.

या ठिकाणी निरीक्षण समितीवर काम करणारे प्रमुख बेन गल्टन-फेंजी यांच्या म्हणण्यानुसार हे हिमनग प्रचंड बर्फाचे गोळे असून पूर्णपणे वितळले तर समुद्र पातळी तीन मीटर (9 .8 फूट) वाढेल.

साधारण १९ व्या शतकापासून ते आजपर्यंत समुद्राची पातळी २० वाढली आहे. जर अशाप्रकारे वितळण्याची प्रक्रिया सुरु राहिली तर निश्चितच काही दिवसात खूप भयानक परिणाम दिसून येतील.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!