कोरोना : पोलीस मदत केंद्राला संपर्क करायचायं? इथे क्लिक करा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हददीतील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना 23 मार्चपासून प्रवास व वाहतूक करण्यात मनाई करण्यात आलेली आहे. जीवनावश्यक व इतर आवश्यक सेवा बजावताना त्रास होवू नये, यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे.

नाशिक शहरात कोरोना ‘ कोव्हीड 19 ‘ या व्हायरसचा संसर्ग टाळण्याकरीता संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे . सीआरपीसी कलम 144 ( 1 ) , ( 3 ) अन्वये वाहन वापरास व वाहतूकीस मनाई आहे. त्यामुळे आरोग्य विभाग , पोलीस, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी निगडीत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी आवश्यक आहे.

त्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’ कार्यानिवत झालेला आहे. तसेच शहरातील सर्व नागरीकांना नाशिक शहरांतर्गत सदर संचारबंदीच्या काळात दवाखाना व वैद्यकीय सारख्या अत्यावश्यक सेवेकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे.

अशा नागरीकांनी त्यांचे नाव, मोबाईल नंबर, अडचणीचे स्वरुप, कोठुन कोठे जाणार, कोणत्या तारखेच जाणार आहे, वार, वेळ व ठिकाण सोबत 1 स्वतःचे ओळखपत्र आधारकार्ड / वाहन परवाना / मतदान कार्ड ही माहिती तसेच ज्या दवाखान्यामध्ये जायचे आहे त्याची माहिती, पोलीस नियंत्रण कक्ष येथील व्हाट्स ॲप मोबाईल नंबर्सवर पाठवावी . तसेच तातडीच्या वैदयकीय सुविधा घेणेकरीता 108 या सरकारी ॲम्बूलन्स सेवेचा देखील लाभ घेण्यात यावा.

व्हाट्सॲप नंबर
1 ) 7020583176
2 ) 8485810477
3 ) 7709295534
4 ) 9373800019
5 ) 02532971233 ( औदयोगीक परवानगी करीता )

नागरीक http://corona.nashikcitypolice.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *