नेवाशात जलशुद्धीकरण यंत्रणेची स्वच्छता ; आता दोन दिवसात मिळणार शुद्ध पाणी

0
नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- नेवासा शहराला काही दिवसापासून होत असलेल्या गढूळ पाणीपुरवठ्यानंतर नगरपंचायतीमध्ये झालेली आंदोलने व राजकीय आरोप-प्रत्यारोपानंतर पाणीपुरवठा होणार्‍या जलशुद्धीकरण यंत्रणेची साफ सफाई काल गुरुवारी प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी स्वतः लक्ष घालून सुरु केल्याने दोन दिवसांत शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळणार आहे.
नेवासा फाटा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला स्वतः नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी यांनी भेट देवून हे काम सुरु केले. या जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने नेवाशातील नागरिकांना दूषित गढूळ पाणी पिण्याची वेळ आली. यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
प्रभारी मुख्याअधिकारी यांनी पाहणी करून गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेऊन नगरपंचायत कर्माचार्‍यांना जलशुद्धीकरण टँक स्वच्छ करण्याचे आदेश दिले.जलशुद्धीकरण यंत्रणेची वेळीच साफसफाई केल्यास ही वेळ येणार नाही. गढूळ पाण्याच्या निमित्ताने नेवाशात आरोप-प्रत्यारोपाने राजकीय वातावरणही गढूळ होऊ लागले होते.
आता दोन दिवसात स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार असल्याने नेवाशातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

LEAVE A REPLY

*