ज्वारी काढण्यासाठी मजूर मिळेनात म्हणून वर्गमित्र सरसावले

ज्वारी काढण्यासाठी मजूर मिळेनात म्हणून वर्गमित्र सरसावले

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा येथील गाडे मळ्यातील युवा शेतकरी सागर रावसाहेब गाडे यांची ७ एकर ज्वारी काढण्यासाठी मजूर मिळेनात म्हणून श्रीगोंदा तालुका येथील महाराजा कॉलेज मधील त्यांचा वर्गमित्र त्यांची ज्वारी काढण्यासाठी सरसावला.

मात्र शेतकऱ्यांना परवडेल अशा रोजंदारीवर शेतमजूर मिळत नसल्याची वस्तुस्थिती श्रीगोंदा तालुक्यात निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतमजुरांची वाणवा आणी वाढलेल्या मजुरी दर यांचा सामना करण्याची वेळ शेतकरी कुटुंबावर आली आहे.

या पार्श्वभूमीवर काही युवक वर्गमित्र शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ज्वारी काढणीस सुरवात केली आहे.सदर वर्गमित्र मढेवडगावचे गोरख उंडे, भोळेवस्तीचे अमोल भोळे , आढळगावचे गणेश बोत्रे, बेलवंडी कोठारचे महेश जाधव , अक्षय जाधव, चांडगावचे महेंद्र मस्के, राहुल जाधव, रावसाहेब गाडे, विठ्ठल डांगरे , विश्वनाथ धुमाळ, संजय लांडगे , रामभाऊ गाडे, सतीश जाधव यांचा समावेश होता.सध्या पुरुषाला पाचशे रुपये तर महिलेला तीनशे रुपये या प्रमाणे मजुरी ध्यावी लागते आहे.

एकरभर ज्वारी काढण्यासाठी सात ते आठ हजार रूपए मजुरी खर्च येतो.सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिरायती पट्टयातील शेतकऱ्यांना हा खर्च परवडनारा नाही.त्यावर उपाय म्हणून गाडे यांचे वर्गमित्र गोरख उंडे यांनी अशी शक्कल लढवली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com