Type to search

maharashtra जळगाव

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात ‘मुन्नाभाई’चा प्रताप

Share

जळगाव  – 

डॉक्टर असल्याचे भासवून एका 12 वर्षीय बालिकेला तपासत असतानाच तो बोगस डॉक्टर असल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात आले. त्याानंतर त्या ‘मुन्नाभाई’ला मंगळवारी दुपारी नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या बोगस डॉक्टरला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परंतु, अधिकृतरित्या कोणाचीच लेखी तक्रार नसल्यामुळे पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

यावल तालुक्यातील मनवेल येथील एका मुलीच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील वॉर्ड क्र.चारमध्ये दाखल केले आहे. त्या ठिकाणी तोंडाला मास्क लावलेल्या मुकेश चंद्रशेखर कदम (रा. मोहाडी ता.जळगाव) याने त्या मुलीची तपासणी करण्यासाठी टेटोस्कोप लावला.त्याने एमडी शिक्षण झाल्याची बतावणी केली.

परंतु, त्या मुलीच्या वडिलांना त्या तरुणाची वर्तणूक डॉक्टरसारखी वाटली नाही.त्याच्या पिवळ्या टी शर्टवर ‘बापाला शिकवणार का?’असे लिहिले होते. त्याच्या तोंडाचा दारुचा वास येत होता. हा तरुण डॉक्टर आहे का? असे त्या मुलीच्या वडिलांनी परिचारिकेला विचारले असता त्यांनी तो तरुण डॉक्टर नसल्याचे सांगितले.

त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली असता काही तरुणांनी त्याला पकडून चोप दिला. त्यास जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिलेे. मुलीच्या वडिलांनी तक्रार देण्यास टाळले. पोलिसांनी जबाब घेतले आहे. दरम्यान हा तरुण थोडा वेडसर असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!