Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

Video# गणपती बाप्पा मोरयाच्या…. जयघोषात विशाल गणपतीचे विसर्जन

Share

भक्तांचे डोळे पाणावले..

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत तसेच मानाच्या विशाल गणपतीचा रथ विसर्जन स्थळाकडे दिल्लीगेट येथून सायंकाळी सहा वाजता बाहेर पडला. यावेळी गणेशभक्तांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा एकच जयघोष यावेळी गणेशभक्तांनी केला. आपल्या लाडका बाप्पाला दहा दिवसांनंतर निरोप दिला आहे. या कल्पनेने अनेक गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते.

यावेळी मानाच्या विशाल गणपतीचे विश्वस्त अभय आगरकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दिल्लीगेट बाहेर यावेळी सामूहिक गणेश आरती झाली. गणेश भक्तांनी यात सहभाग घेतला होता. मानाच्या विशाल गणपतीसमोर तीन ढोल पथक होते. महिलांनी हिरव्या साड्या आणि भगवे फेटे घालून मराठी पारंपारिक गाण्यांवर मिरवणुकीत सहभाग घेतला होता, महिलांचा हा सहभाग लक्षवेधी ठरला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!