Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : सावेडीत चोरट्यांचा हैदोस !

Share

तीन शोरूममध्ये चोरी । सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीत मंगळवारी रात्री चोरट्यांनी हैदोस घालत ‘डाव’ साधला. हायवेवरील एक आणि अन्य दोन शो रूममध्ये चोरी करत चोरटे पसार झाले. ही चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून पोलीस चोरट्यांच्या मागावर निघाले आहेत.

नगर-मनमाड हायवेवरील सावेडी नाका परिसरातील मराठा सायकल सेंटर, एमआरएफ टायर आणि बॅटरीच्या शो रुममध्ये चोरीचा प्रकार आज बुधवारी सकाळी उघडकीस आला. दुकानांचे शटर उचकटून चोरटे आतमध्ये शिरले. तिन्ही दुकानांमध्ये चोरीची एकच पध्दत असल्याने एकाच टोळीने हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा संशय आहे. दुपारपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

घटनेची माहिती मिळताच नगर सीटीचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांकडून चोरी झालेल्या ठिकाणांचा पंचनामा सुरू आहे.

हायवेवरील दुकाने टार्गेट
मराठा सायकल सेंटर हे दुकान हायवेकडेला आहे. इतर दोन दुकानेही रस्त्याकडेलाच आहेत. त्यामुळे चोरट्यांनी चोरीसाठी रस्त्याकडेची दुकाने हेरून वाहनाने पसार होण्याचा मार्ग स्वीकारल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!