Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर : नगरी रिंगणात दोघांत तिसरा

Share

किरण काळे यांना ‘वंचित’ची उमेदवारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले अनिल राठोड यांच्या विरोधात संग्राम जगताप आमदारकीच्या फडात लढणार हे नक्की झालं असतानाच आज तिसरा भिडू नगरी फडात उतरला. किरण काळे यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्याने तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कालच (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलेले किरण काळे वंचित बहुजन आघाडीच्या गळाला लागले. माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी काळे यांच्या उमेदवारीची घोषणा मुंबईमध्ये केली आहे. या घोषणेमुळे नगर शहरातील निवडणूक ही दोन भैय्या विरुद्ध काळे अशी तिरंगी होणार आहे.

नगर शहर गेल्या तीस वर्षापासून विकासापासून वंचित आहे. म्हणूनच आपण नगरकरांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठीच विकासापासून वंचित असणार्‍या शहरासाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावर नगर शहराची निवडणूक लढणार असून या माध्यमातून नगरकर परिवर्तनाचं एक मोठ जनांदोलन उभा करतील असा विश्‍वास काळे यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकार्‍यांना, ज्येष्ठांना बरोबर घेऊन आम्ही एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ, असे काळे यांनी सांगितले.

दोघंही सारखेचं!
कोणाला पराभूत करण्यासाठी किंवा कोणाच्या विरुद्ध नसून जातीयवादी पक्ष आणि दहशत, गुंडगिरी प्रवृत्ती विरुद्ध आहे. शहरातील मतदारांनी गेल्या तीस वर्षात दोनच नेतृत्वांना संधी दिली. माजी आमदारांना पाच-दहा नव्हे तर तब्बल पंचवीस वर्ष मोठ्या अपेक्षेने संधी दिली होती. परंतु विकास तर दूरच त्यांनी शहराची दुर्दशा करून टाकली. विद्यमान आमदारांना गत विधानसभा निवडणुकीत संधी मिळाली. पण त्यांनी विकास करण्याऐवजी आपला गुंडगिरीचा, दहशतीचा वारसा चालवण्यात धन्यता मानल्याचा आरोप करत काळे यांनी नगरकर या दोन्ही नेतृत्वामुळे हैराण असल्याचा दावा केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!