Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगर: शहरातून हद्दपार नगरसेवक समदखानची पोलीसांना धक्काबुक्की

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव व मोहरम काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 8 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान शहरातून हद्दपार करण्यात आलेला नगरसेवक समदखान वहाबखान खान (रा.सिरीनबाग मुंकूंदनगर) याने हद्दपार कायद्यचा भंग करून शहरात त्याच्या राहत्या घरासमोर मिळून आला. पोलीसांनी चौकशी केली असता पोलीसांना धक्काबुक्की करून पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी हे आपल्या पथकासह भिंगार कॅम्प हद्दीतून हद्दपार केलेल्या व्यक्तीची पाहणी करत होते.हे पथक समदखान याला नोटीस बजावली असल्याने तो शहरातून निघून गेला आहे का नाही हे पाहण्यासाठी त्याच्या राहत्या घरी शहरातील सिरीनबाग, मुकूंदनगर येथे गेले.त्याच्या विषयी घरात विचारणा केली असता तो बाहेर गावी गेला असल्याचे सांगितले. परंतु, घरासमोर पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये समदखान मिळून आला.पोलीसांनी विचारणा केली असता तो त्याठिकाणाहून पळून गेला. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता पथकातील पो.हेड.कॉ अजय नगरे याने हात पकडला असता त्यांना धक्काबुक्की करून तो पळून गेला. याप्रकरणी पो.हेड.कॉ अजय नगरे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!