का तुंबले नाशिक? मत नोंदवा, उपाय सुचवा

1

कालच्या पावसामुळे नाशिक तुंबले, वाहतूक कोलमडली, अनेक घरांचे नुकसान झाले? का तुंबले नाशिक? भुयारी गटार योजनेत काही घोळ झाला का? व्यवस्था-प्रशासनात कुठे पाणी मुरतेय का? या प्रश्न पडले असतील तर नक्कीच येथे निर्धास्तपणे मत नोंदवा, उपायही सूचवा.

काल नाशिक शहरात जोरदार पाऊस झाला. दोन तासात ९२ मिमी इतकी नोंद झाली. पावसामुळे सराफबाजार, दहिपूल या ठिकाणच्या रस्त्यांना नदीचे रुप आले. शहरातील अनेक भागात पाणी साचले. घरांत पाणी शिरले. लोकांचे नुकसान झाले.

सिटी सेंटर मॉल, उंटवाडी, त्र्यंबकरोड परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा अभूतपूर्व खोळंबा झाला. उडडाणपुलाखालीही आणि उड्डाणपूलावरही पाणी साचले आणि ऐन गर्दीच्या वेळेस सायंकाळी सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडली.

नाले-गटारे वेळीच साफ न केल्याने, पाण्याचा निचरा न झाल्याने मुंबईचे रस्ते तुंबतात. तिच गत आता नाशिकचीही होऊ लागली आहे.

कशामुळे होत असेल हे? का तुंबले नाशिक? का झाला वाहतुकीचा खोळंबा? का झाले नाशिककरांचे नुकसान? भुयारी गटार योजनेत काही घोळ झाला का?

हे सर्व प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. आपणही देशदूतच्या या व्यासपीठावर आपले मत जरूर मांडा? उपायही सूचवा. बदल होऊ शकतो? आपण पुढाकार घेण्याची गरज आहे.

1 COMMENT

  1. नाले-गटारे वेळीच साफ न केल्याने, पाण्याचा निचरा न झाल्याने तसेच मोठ्या प्रमाणात प्ल्यास्तिक नाले तुंबण्याचे कारण बनला आहे ………तसेच नाले सफाई हि वेळेत झालेली नाही …..
    डॉ संदीप भानोसे

LEAVE A REPLY

*