Type to search

Featured सार्वमत

शहर सुशोभिकरणासाठी संस्था घेणार पुढाकार!

Share

आयुक्तांनी घेतली बैठक, मनपा आराखडा तयार करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चौकांचे सुशोभिकरण, पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून महापालिका उपक्रम राबविणार आहे. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी यासाठी पुढाकार घेत विविध क्षेत्रातील संस्था, कंपन्या, बँकांच्या प्रतिनिधींची बैठकही त्यांनी घेतली. यात संस्थांनी पुढाकार घेऊन सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. बैठकीसाठी चर्चेनुसार यासंदर्भात आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी लवकरच समितीही गठीत केली जाणार असल्याचे आयुक्त भालसिंग यांनी सांगितले.

विविध उपक्रम विविध संस्थांच्या सहभागातून राबविण्यासाठी महापालिका शहरातील कंपन्या, संस्था, बँकांचा सहभाग घेणार आहे. बुधवारी (दि. 15) यासंदर्भात बैठकही पार पडली. यावेळी उपायुक्त सुनिल पवार, शहर अभियंता विलास सोनटक्के, अभियंता कल्याण बल्लाळ, राजेंद्र मेहेत्रे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अशोक सातकर, ‘एल अँड टी’चे ईश्‍वर हांडे, शेखर देशमुख, क्रेडाईचे अमित मुथा, राहुल पितळे, सलीम शेख आदींसह महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक आदी बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी आयुक्त भालसिंग यांनी उपक्रमांबाबत संकल्पना मांडली.

महापालिकेच्या शाळांचे अद्ययावतीकरण, वर्गखोल्यांची उभारणी, दुरुस्ती, उद्यान विकसित करणे, शहरातील पर्यटन स्थळांच्या माहितीचे फलक लावणे, कॉफी टेबल बुक तयार करणे, सीना नदी सुशोभिकरण, छोटे कंपोसिट्ंग प्लँट, मनपा रुग्णालयांमध्ये आवश्यक साहित्य, उपकरणे पुरविणे आदींसह इतर काही उपक्रमांसाठी संस्था, बँका, कंपन्यांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांच्या संकल्पना व सूचनाही त्यांनी मागविल्या. महापालिकेने अपेक्षित उपक्रमांसंदर्भात बुकलेट तयार करावे, किती चौकांचे सुशोभिकरण करायचे, मनपाला कुठे व कोणते साहित्य अपेक्षित आहे, रुग्णालये, शाळांमध्तये कायझ-काय सुविधा, उपकरणे आवश्यक आहेत याची माहिती व त्यासाठी आवश्यक खर्च याची माहिती एकत्रित करून जाहीर करावी. विविध संस्था या उपक्रमांसाठी पुढाकार घेतील, अशी सूचना अशोक सातकर यांनी माडली. इतर उपस्थितांनीही याबाबत सूचना मांडल्या.

यासंदर्भात महापालिकेकडून आराखडा तयार करण्यात येईल. त्यासाठी मनपा व संस्थांचे प्रतिनिधी अशी समिती तयार करण्यात येईल, असे आयुक्त भालसिंग यांनी स्पष्ट देले. दरम्यान, ही प्राथमिक बैठक असून, यासंदर्भात लवकरच आणखी एक बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!