Type to search

Featured सार्वमत

नगरमधून 358 हद्दपार

Share

प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- येत्या काही दिवसांतील सण आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 358 लोकांना 24 एप्रिलपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय 436 जणांवर सशर्त कारवाई करण्यात आली आहे. भिंगार, तोफखाना, कोतवाली व एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे हे प्रस्ताव असून, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व नगर तहसीलदार उमेश पाटील यांनी हे आदेश काढले आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

उत्सव व निवडणूक काळात शहरात शांतता व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 13 एप्रिल रोजी रामनवमीचा उत्सव होता. 14 एप्रिलला आंबेडकर जयंती, 17 एप्रिलला महावीर जयंती व 23 एप्रिल रोजी लोकसभेचे मतदान आहे. या सर्व काळात शहरात शांतता राहावी, यासाठी भिंगार, तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी पोलीस ठाण्यांकडून एकूण 797 जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व तहसीलदार पाटील यांच्याकडे आले होते. त्यावर निर्णय घेत प्रांताधिकार्‍यांनी त्यातील 262 जणांना हद्दपार केले. याशिवाय 344 जणांकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बंधपत्र व 52 जणांकडून राजपत्रित अधिकार्‍यांचे बंधपत्र घेऊन त्यांना सशर्त शहरात राहण्याची परवानगी दिली आहे. हे बंधपत्र संबंधितांनी 24 तासांच्या आत संबंधित पोलीस ठाण्यात जमा करायचे आहे. तसेच दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावायची आहे.

तहसीलदारांकडून 136 प्रस्तावांवर कार्यवाही
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याने 136 प्रस्ताव कारवाईसाठी पाठवले होते. त्यातील 96 जणांना नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी हद्दपार केले असून 40 जणांवर सशर्त कारवाई करण्यात आली आहे.

एकूण हद्दपारी आणि कंसात कारवाई
भिंगार 293 (140), तोफखाना 251 (120), एमआयडीसी 114 (2), कोतवाली 136 (96) यांचा समावेश आहे.

यांच्यावर कारवाई
धनंजय गाडे, संजय गाडे, अंकुश मोहिते, बबलू सूर्यवंशी, कुलदीप भिंगारदिवे, घनशाम बोडखे, गजानन भांडवलकर, बाबासाहेब गाडळकर, सचिन गवळी, दीपक घोडेकर, सय्यद आसिफ, आशिष शेख, वैभव जाधव, वैभव ढाकणे, वैभव दारूणकर, चेतन चव्हाण, नितीय जायभाय, सनी लोखंडे, पवन भिंगारदिवे, मोमीन अन्सारी, लालासाहेब शेख, हुसेन शेख, ईश्वर बेरड, शुभम जरे, ऋषिकेश हजारे, फिरोजखान पठाण, गणेश पोटे, किरण पिसोरे, राजेंद्र ससे, दीपक सूळ, सुरेश मेहतानी, सुदाम शिरसाठ, संजय दिवटे, काशिराम शिंदे, वैभव म्हस्के, शाहरूख पठाण आदींसह 262 जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!