Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; अभिषेक कळमकर यांचा शिवसेनेत प्रवेश

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे व माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीसाठी हा धक्का मानला जात आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासून कळमकर कुटुंबिय ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहे. विधानसभा निवडणुकीत आ. संग्राम जगताप शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेवेळी अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. महापालिका निवडणुकीपासून विशेषतः महापौरपदाच्या निवडणुकीपासून कळमकर आणि जगताप यांच्यात दुरावा निर्माण झाला. मध्यंतरी ज्येष्ठ नेते शरद पवार नगर दौर्‍यावर असताना त्यांचा मेळावा संपल्यानंतर त्याच ठिकाणी अभिषेक कळमकर यांच्यावर चपला भिरकावण्यात आल्या होत्या. हा प्रकार आ. संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप कळमकर यांनी केला होता. तशी फिर्याद देण्यासाठी ते पोलिसात गेले होते. तेथे आ. जगताप आल्यानंतर तीन तासांच्या चर्चेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र त्यावेळपासून कळमकर आणि त्यांचे समर्थक आ. जगताप यांच्यावर नाराज होते.

ही दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही कळमकर यांनी नंतर दिला होता. दोन दिवसांपासून ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा होती. शिवसेना की भाजप, असा संभ्रम त्यांच्यापुढे होता. अखेर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी नगर येथे झालेल्या सभेत शिवसेनेत प्रवेश करत ही संभ्रमावस्था दूर केली. दादाभाऊ कळमकर या प्रवेशापासून दूर असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. त्यांच्या इच्छेविरूद्ध हा प्रवेश झाल्याचे अभिषेक कळमकर यांनी केलेल्या भाषणावरून जाणवत असले, तरी विचारविनिमय करूनच हा प्रवेश झाल्याचे राष्ट्रवादीत मानले जाते. कळमकर ज्येष्ठ नेते असून, शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!